मंगळवेढा / मदार सय्यद
अंकुश पडवळे याना कृषीभुषण पुरस्कार जाहिर
महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा कृषीभुषण पुरस्कार खुपसंगी चे प्रगतशिल शेतकरी व गटशेतीच्या माध्यमातून डाळिंब युरोपला एक्सपोर्ट करणारे शेतकरी अंकुश पडवळे यांना जाहिर.
अंकुश पडवळे यांनी शेती मध्ये नवनवीन प्रयोग करुन अनेक शेतकऱ्यांना संघटित करुन गटशेती मोठ्या पध्दतीने करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच राज्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना संघटित करुन महा अॉरगॕनीक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशनची स्थापना करुन सध्याते अध्यक्ष आहेत, पुणे येथिल मगरपट्टा येथे शेतकऱ्यांची पहिली सेंद्रिय आउटले खा. शरदचंद्रजी पवार यांच्या सहकार्याने करुन सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी काम केले आहे. शेतकऱ्यांची अनेक आंदोलने करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना नेहमीच वाचा फोडायचे काम पडवळे यांनी केले आहे. पडवळे यांनी शेती क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल यापूर्वीच त्यंना राज्यपातळीवरील वीस पुरस्कार मिळालेले आहेत. पण राज्य शासनाचा राज्यातील सर्वोच्च कृषीभुषण पुरस्काराने त्यात मोठी भर घाटली आहे.