मारोळी येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास आमदार भालके यांची मदत - Pantnagari Times

Breaking News

Saturday, February 23, 2019

मारोळी येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास आमदार भालके यांची मदतमारोळी येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास आमदार भारत भालके यांची मदत

मंगळवेढा / प्रतिनिधी

दुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून मारोळी (ता.मंगळवेढा) येथील राजू बुर्हाणसो सनदी या शेतकऱ्यानी बुधवारी आत्महत्या केली. सनदी कुटुंबियांच्या घरी जाऊन आमदार भारत भालके यांनी सांत्वन केले. व २५ हजारांची आर्थिक मदत केली आहे.

यावेळी बसवराज पाटील, नायब तहसीलदार सुधाकर धाईजे, तालुका कृषी अधिकारी नामदेव गायकवाड ,आप्पासाहेब माने,पोलीस पाटील शिवकुमार पाटील,खुदाभाई शेख,दिलावर सनदी, एकनाथ पांढरे, आदीजन उपस्थित होते 

सनदी कुटुंबियांना शासनाकडील विमा योजनेतून  मदत मिळावी यासाठी आ.भालके यांनी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर मदतीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

Pages