आ भारत भालके यांच्या प्रयत्नामुळे भोसे येथील भैरवनाथ मंदिरास ब वर्गाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा - Pantnagari Times

Breaking News

Thursday, February 21, 2019

आ भारत भालके यांच्या प्रयत्नामुळे भोसे येथील भैरवनाथ मंदिरास ब वर्गाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा
मंगळवेढा / मदार सय्यद  

भोसे तालुका मंगळवेढा येथील श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थानासाठी रुपये दोन कोटी मंजूर झाले असून ब वर्ग तिर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळाल्याने आ.भारत भालके यांच्या प्रयत्नाबद्दल भाविक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

गावातील लोकांच्या मागणीनुसार आ. भारत भालके यांनी या देवस्थानच्या विकासासाठी राज्य सरकारकडे ब वर्ग देवस्थान दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न केले होते यामध्ये राज्य निकष समितीची 31 जानेवारी रोजी बैठक झाली या मध्ये ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे सचिव असीम गुप्ता उपसचिव मनोज जाधव कक्ष अधिकारी श्रीयुत तेलवेकर उपस्थित होते या बैठकीत भोसे देवस्थानचा ब वर्ग तीर्थक्षेत्रांमध्ये समावेश करण्यात आला असून 14 फेब्रुवारी रोजी मंजुरीचा आदेश पारीत करण्यात आला आहे ब  वर्गात समावेश झाल्याने या देवस्थानच्या  विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मिळणार असून यातून मंदिर परिसर सुशोभीकरण पुरुष व महिलांसाठी भक्तनिवास शौचालय वाहनतळ हायमास्ट दिवे संरक्षक भिंत जोडरस्ता या सुविधा मिळणार असल्याने या कामामुळे भाविक भक्त आनंदित झाले आहेत भोसे येथील श्रीक्षेत्र भैरवनाथ मंदिरामध्ये दरवर्षी चैत्र अष्टमीला यात्रा मोठ्या प्रमाणात भरविली जाते भोसे गावचे हे ग्राम दैवत असल्याने गावातील लोकांची मोठी श्रद्धा या देवस्थानावर आहे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील हजारो लोक या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेटी देत असतात या भागात कुस्त्याच्या स्पर्धांचे आयोजन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात आता या मंदिराला ब वर्ग मिळाल्याने मंदिर परिसराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

-------

मंगळवेढा तालुक्यातील भोसे गावचे  ग्रामदैवत भैरवनाथ या देवस्थानाला तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश व्हावा म्हणून सर्व भावीक भक्ता मधून व ग्रामस्थांच्या वतीने पुरवठा करण्यात येत होता याची दखल घेत आमदार भारत नाना भालके यांनी वेळोवेळी पाठ पुरवठा करून महाराष्ट्र शासनाकडून तीर्थ-क्षेत्र विकास आराखड्यातून ब  वर्गा मधून दोन कोटी रुपये चा विकास निधी मिळवून दिल्याबद्दल भाविक भक्ताकडून व भोसे ग्रामस्थां मधून समाधान व्यक्त होत आहे 

तानाजी काकडे 

माजी उपसरपंच भोसे ता.मंगळवेढा

Pages