मारोळी येथील शेतकऱ्यांने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन केली आत्महत्या - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, February 20, 2019

मारोळी येथील शेतकऱ्यांने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन केली आत्महत्या
मंगळवेढा / प्रतिनिधी

 मंगळवेढा तालुक्यातील मारोळी येथील शेतकरी राजू बुर्हाणसो सनदी (वय.४४) यांनी कर्जाचा कंटाळून राहत्या घराची कडी लावून गळफास घेतला. या घटनेने विदर्भ मराठवाड्यातील लोणी आता दुष्काळी मंगळवेढ्यातही थांबेना. दुष्काळी उपाययोजनेसाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे अन्यथा हे लोण वाढण्याची शक्यता आहे.


सनदी यांच्या पश्चात दोन मुली पत्नी असा परिवार आहे. अल्प जमिनीवर असलेले कर्ज फेडण्याच्या प्रतिक्षेत असताना विंधन विहीरीचे पाणी गेले त्यामुळे असलेले बागायत पीक वाया गेले. कर्जाचा डोंगर वाढणार यातून नैराश्य निर्माण झाल्याने त्यांनी जीवन संपवले. 

या भागात पाण्याची पातळी खाली गेल्याने फळबागा जतन करण्यासाठी शेतकरी जीवाचे करत उर्वरीत तीन महिने चिंतेचे असल्याने प्रशासनाने आधार देण्याची आवश्यकता आहे. राजकीय श्रेयवाद न होता म्हैसाळचे पाणी उपलब्ध झाल्यास दुष्काळी तीव्रतेतून घट होवू शकते.

Pages