अपघाती मृत्यू झालेल्या दामाजी च्या सभासदांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत
मंगळवेढा / प्रतिनिधी
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे सभासद असलेल्या लाभार्थ्यांचा विमा युनायटेड इंडिया कंपनी पंढरपूर यांचेकडे उतरविला होता यामधील अपघाती मृत्यू झालेल्या सभासदाच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयाचे विम्याचे चेक प्रदान करण्यात आले. विमल तुकाराम कसबे खडकी संगीता बीराप्पा चौधरी सुरेखा दत्तात्रय सावंत कविता समाधान हेंबाडे यांनाही या दिवशी चेक देण्यात आले.हा कार्यक्रम खडकी ता मंगळवेढा जि सोलापूर येथे घेण्यात आला. याचे वितरण संचालक सुरेश भाकरे, संचालक भुजंगराव आसबे ,भारत निकम सरपंच सरपंच रघुनाथ बेलदार सखाराम बेलदार उपसरपंच सौ. इंदुबाई जाधव नवनाथ लुगडे ,सकाराम बेलदार सरपंच बाळासाहेब कवाळे, जयसिंग राजपूत, अशोक जाधव अशोक घोडके, हौसाप्पा शेवडे,आंबादास कांबळे, तानाजी चौगुले, दगडू फटे, विठ्ठल जाधव, भाऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते. ही विम्याची रक्कम लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी पंढरपूर युनायटेड इंडिया कंपनीचे अधिकारी अविनाश मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

यापुढील कालावधीत सभासदांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत दामाजी कारखान्याचे संचालक सुरेश भाकरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत निकम यांनी केले तर आभार प्रदर्शन दगडू पाटील यांनी मानले.