सोलापूर-पंढरपूर महामार्गावर कार-बसचा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार - Pantnagari Times

Breaking News

Saturday, February 2, 2019

सोलापूर-पंढरपूर महामार्गावर कार-बसचा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार


पंढरपूर / प्रतिनिधी

सोलापूर-पंढरपूर महामार्गावर कार-बसचा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

मृतांमधील सर्वचजण मुंबईचे रहिवासी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सोलापूर - सोलापूर-पंढरपूर महामार्गावर कार व एस-टी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमधील सर्वचजण मुंबईचे रहिवासी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 

मुंबईहून निघालेली एमएच03 AZ 3116 क्रमांकाची कार एसटी बसला समोरासमोर धडकली. राज्य परिवहन महामंडळाच्या इस्लामपूर अगराची इस्लामपूर- अक्कलकोट ही बस सोलापूर कडे निघाली असता देगाव ( ता पंढरपूर ) हद्दीत समोरून येणारी इको मारुती ही गाडी जोरात धडकली. कारने बसला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. सध्या अपघातातील मृतांना सरकारी रुग्णालयात नेण्यात येत असून मृतांची ओळख पटविण्याच काम सुरू आहे. मृतांमध्ये दोन महिला, दोन पुरुष व एका लहान मुलाचा समावेश आहे. तर दोन  गंभीर जखमींना पंढरपूर येथील सरकार रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

Pages