मंगळवेढा शहरात शिवसेनेच्या 21 शाखांचे उद्घाटन गणेश वानकर...शैलाताई गोडसे यांचे संघटन कौशल्य कौतुकास्पद ..... - Pantnagari Times

Breaking News

Friday, February 1, 2019

मंगळवेढा शहरात शिवसेनेच्या 21 शाखांचे उद्घाटन गणेश वानकर...शैलाताई गोडसे यांचे संघटन कौशल्य कौतुकास्पद .....

मंगळवेढा / मदार सय्यद


       आमदार तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शैलाताई गोडसे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांनी अल्पावधी मध्येच पंढरपूर आणि मंगळवेढा भागातील जनतेच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडून शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे काम हाती घेतलेले आहे यामध्ये म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी केलेले आंदोलन असेल किंवा मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी घरोघरी जाऊन केलेली जनजागृती असेल लोकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी एमआयडीसीमध्ये उद्योगधंदे उभारण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न असतील अशा अनेक विषयांना वाचा फोडण्याचे काम करत असताना शिवसेनेमध्ये आल्यापासून त्यांनी संघटनात्मक बांधणीचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे त्यांच्या पाठीमागे जिल्हा शिवसेना खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी दिली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये 51 शाखांचे उद्घाटनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता त्या अनुषंगाने 23 जानेवारी रोजी पंढरपूर येथील 30 शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर  दिनांक 30 जानेवारी 2019 रोजी मंगलवेढा शहरांमध्ये 21 शिवसेना शाखेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील सोलापूर जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या शुभ हस्ते व  जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैलाताई गोडसे युवा सेना जिल्हाप्रमुख  स्वप्नील वाघमारे उपजिल्हाप्रमुख सुधीरअभंगराव उपजिल्हाप्रमुख तुकाराम भोजने मोहोळ तालुका प्रमुख अशोक भोसले विधानसभा संघटक विजय कुलबरमे तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे माजी तालुकाप्रमुख येताळा भगत शहर प्रमुख सुनील  दत्तू शहर समन्वयक नारायण गोवे  तालुका समन्वयक श्रीशेल कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते 

तत्पूर्वी सायंकाळी पाच वाजता पहिल्या शाखेचे उद्घाटन केल्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक शाखेचे उद्घाटन केले शेवटच्या एकविसाव्या शाखेच्या उद्घाटनाच्या ठिकाणी सभे मध्ये रूपांतर झाले यावेळी सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैलाताई गोडसे यांनीही शिवसैनिकांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील म्हणाले की म्हैसाळच्या पाण्यासाठी एक शिवसेना पक्षाची प्रमुख पदाधिकारी असलेली एक महिला शिरनांदगी तलावामध्ये पाण्यासाठी रात्रंदिवस आंदोलन करत असेल जनतेच्या प्रश्नासाठी न्याय हक्कासाठी लढा उभा करत असेल तर जनता नक्कीच शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी तालुका संघटक सुभाष तानगावडे शहर संघटक सलीम खतीब ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब पाटील माजी उपनगराध्यक्ष संजय घोडके तालुका उपप्रमुख गंगाधर मसरे कृष्णा सपकाळ संभाजी खापे अरुण मोरे शंकर भगरे शहर उपप्रमुख बापू खराडे रमेश जाधव सतिष शिर्के गणेश कुराडे विशाल इंगळे विभाग प्रमुख प्रकाश पवार रमेश ढगे धनाजी गवळी सदाशिव सरवळे आण्‍णासो भोजने रमेश चोपडे दयानंद डावरे दीपक आसबे हनुमंत कोरे दत्ता माने दत्ता टिके दत्ता कळकुंबे सुरेश नरळे बिराप्पा ढाणे भाऊसाहेब आवताडे कमलाकर कदम दादा पाटील विशाल जाधव गणेश घाडगे शैलेश गोवे अक्षय कोळी विनायक माने किरण क्षीरसागर विनायक शिर्के सलमान बेग प्रतीक होडगे संजय साळुंखे पांडुरंग गेजगे जमीर सुतार सचिन मुळे किशोर परचडे मुन्ना मुळे अमित सावंत अजिंक्य सूर्यवंशी निहाल कोळी इत्यादी मंगळवेढा तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख शिवसैनिक शिवसेना प्रणित सर्व संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रास्ताविक तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे यांनी केले तर आभार उपजिल्हाप्रमुख तुकाराम भोजने मानले

      पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना पक्षाची फार मोठी ताकद आहे पंढरपूर आणि मंगळवेढा शहरांमध्ये 51 शाखांची  पुनर्बांधणी करून संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे यापुढे पंढरपूर मंगळवेढा मोहोळ या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये शिवसेनेच्य शाखेची पुनर्बांधणी करून शिवसैनिकांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे

सौ शैला गोडसे 

जिल्हाप्रमुख शिवसेना महिला आघाडी

Pages