मंगळवेढा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतून 140 लाभार्थीचे आर्ज मंजूर - शशिकांत चव्हाण - Pantnagari Times

Breaking News

Friday, February 1, 2019

मंगळवेढा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतून 140 लाभार्थीचे आर्ज मंजूर - शशिकांत चव्हाणमंगळवेढा / प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतून  140 लाभार्थीचे आर्ज मंजूर - शशिकांत चव्हाण

संजय गांधी निराधार योजना समिती बैठकीत तब्बल 140 लाभार्थींचे अर्ज मंजूर करण्यात आले आली असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी माहिती दिली त्यानंतर सांगितले की. जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजना पोहोचण्यासाठी निराधार समिती मार्फत पाठपुरावा केला जात आहे. आता येणार्‍या  दि 25 फेब्रुवारी रोजी मीटिंग आयोजित केली असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसार करण्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक यांना सुचना देण्यात आल्या असून संजय गांधी निराधार योजना लाभ घेण्यासाठी गावातील लाभार्थी शोधून त्यांना ऑफिस स्तरावर मदत करून त्यांचे अर्ज स्विकारण्याची समितीचे अध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी सांगितले आहे. 

सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात येते आपण आपले अर्ज ग्रामसेवकांना दिले तरी चालतील ते ग्रामसेवकांनी त्वरित संजय गांधी निराधार योजना समिती कडे सादर करावेत . अपंगांसाठी 50000 उत्पन्न दाखला स्विकारला जात असून सर्व अपंग बंधू भगिनींना  आपले अर्ज सादर करावेत. अपंगांसाठी 800 ते 1000 अनुदान सुरू झाले आहे. या मीटिंगमध्ये नायब तहसीलदार मागाडे. वाघमोडे. समिती सदस्य दत्तात्रय जमदाडे. बिरुदेव घोगरे. अण्णा मोरे. दीपक माने. शुभांगी सूर्यवंशी. सिद्धू दत्तू. पांडुरंग शिंदे. संजय कडलास्कर, अविनाश आठवले, उपस्थित होते.

Pages