सकल धनगर समाजाचा मोदींच्या सोलापूरातील सभेवर बहिष्काराचा निर्णय - Pantnagari Times

Breaking News

Monday, January 7, 2019

सकल धनगर समाजाचा मोदींच्या सोलापूरातील सभेवर बहिष्काराचा निर्णयमंगळवेढा- मदार सय्यद
----------------------------


      सोलापूरातील 2014 च्या सभेत धनगर समाजास दिलेल्या आश्‍वासनाचा पंतप्रधान मोदींना विसर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे दिनांक 9 जानेवारी रोजी सोलापूरातील पार्क मैदानावर आयोजन करण्यात आले आहे.2014 च्या सोलापुरातील प्रचार सभेत बोलताना नरेंद्र मोदींनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सत्तेवर येताच तात्काळ निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली होती.कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सत्तकाळात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करीत राजकारण करण्यात आल्याने धनगर समाजाने भाजपास मोठया आशेने मतदान केले होते.धनगर समाजाच्या मतांच्या जिवावर राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळविल्यानंतर मात्र कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसप्रमाणेच या सरकारचे खायचे दात वेगळेच आहेत याची प्रचिती धनगर समाजाला आली आहे.आता धनगर समाज पुन्हा भुलथापांना बळी पडणार नाही हे दाखवून देण्यासाठीच सकल धनगर समाजाने पंढरपूरात झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींच्या सोलापूरातील सभेवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे अशी माहीती माउली हळणवर व समन्वयक प्रा.सुभाष मस्के,आदित्य फत्तेपूरकर यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर येथे आयोजीत सभेच्या निमित्ताने धनगर समाजाच्या अनुसुचीत जमातीच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून 2014 च्या लोकसभा प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर व पंढरपूरात सभा झाल्या होत्या.या दोन्ही ठिकाणी बोलताना नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत दिलेल्या आश्‍वासनाचा सरकारला विसर पडल्यामुळे धनगर समाजाच्या भावना संतप्त झाल्या आहेत.त्यामुळेच सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरीत सोमवारी जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीर राजकीय पक्ष,गट-तट बाजूला ठेवून मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस शिवाजी बंडगर(करमाळा),रविकिरण कोळेकर(मंगळवेढा),परमेश्‍वर कोळेकर(सांगोला),के.पी.काळे पाटील(माळशिरस),धनाजी पुजारी(मोहोळ),पवन पाटील(सोलापूर),किशोर सलगर(माढा),बाळासाहेब बंडगर(द.सोलापूर) यांच्यासह सोलापूर जिल्हयातील धनगर समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Pages