मंगळवेढा / प्रतिनिधी
-------------------------
उपायुक्त रविंद्र जाधव लाच स्विकारताना रंगेहाथ लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
पंढरपूर नगरपालिकेचे होते मुख्याधिकारी.
धुळे महानगरपालिकेचे उपायुक्त रविंद्र शेषराव जाधव (५१) यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केलीय. मनपातील उपशिक्षकाचे पाच महिन्याचे थकित वेतन काढण्यासाठी रविंद्र जाधवांनी शिक्षण मंडळाच्या लिपिका मार्फत १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. रविंद्र जाधवांना १५ हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ १४ जानेवारी रोजी पकडण्यात आले .
रविंद्र जाधव यांच्यासह शिक्षण मंडळाचे लिपिक आनंद बापूराव जाधव यांना ताब्यात घेतले आहे. रविंद्र जाधवांनी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून देखिल काम पाहिले आहे.