राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा भाजपात प्रवेश
मंगळवेढा / प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी जालना येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ढोबळे हे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. गेल्या काही दिवसांपूर्वी ढोबळे यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. अखेर आज राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी जालना येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजप जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार, शहर अध्यक्ष अशोक निम्बर्गी हे उपस्थित होते.