कर्मयोगी विद्यानिकेतन पाठखळ या प्रशालेचे कार्य कौतुकास्पद - सौ.सीमाताई परिचारक - Pantnagari Times

Breaking News

Saturday, January 19, 2019

कर्मयोगी विद्यानिकेतन पाठखळ या प्रशालेचे कार्य कौतुकास्पद - सौ.सीमाताई परिचारक
कर्मयोगी विद्यानिकेतन पाठखळ या प्रशालेचे कार्य कौतुकास्पद - सौ.सीमाताई परिचारक

  मंगळवेढा / प्रतिनिधी

प्रशालेचा प्रथम वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न

पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित, कर्मयोगी विद्यानिकेतन पाठखळ या प्रशालेने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याने मंगळवेढा तालुक्यामध्ये शैक्षणिक क्रांतीस सुरुवात झाली असून प्रशालेच्या वतीने राबविण्यात येत असलेले उपक्रम अधिकाधिक लोकप्रिय होत असल्याचे प्रतिपादन पांडुरंग प्रतिष्ठान च्या संचालिका सौ. सीमाताई प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले. त्या कर्मयोगी विद्यानिकेतन या प्रशालेचा  प्रथम वार्षिक  स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या. 

    प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात सौ.सीमाताई परिचारक यांच्या शुभहस्ते तसेच युटोपीयन शूगर्स चे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांच्या सुविद्यपत्नी सौ.विजयाताई पाटील,कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर च्या प्राचार्या सौ.शैलाताई कर्णिकर.माधवीताई हवालदार प्र.मुख्याध्यापिका रूपाली काळुंगे,तनिशा पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

      सदर प्रसंगी बोलताना सौ. परिचारक म्हणाल्या की, मंगळवेढा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन पाठखळ या प्रशालेने शैक्षणिक प्रगति बरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने आयोजित केलेले स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत आदर्श समाज व्यवस्था घडविण्यासाठी उचललेले क्रांतिकारी पाऊल असून कर्मयोगी विद्यानिकेतन चे हे कार्य कौतुकास्पद आहे. या प्रशालेने अल्पावधीतच  एक वेगळा आदर्श निर्माण केला असल्याचे मत ही सौ.परिचारक यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर च्या प्राचार्या सौ.शैलाताई कर्णिकर म्हणल्या की मागील 25 वर्षाहून ही अधिक काळ मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करीत आहे. विविध संस्था मध्ये मी कार्य केले आहे. मात्र, पांडुरंग परिवारामधे परिचारक साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणार्‍या सर्व संस्था या समाजाला वेगळी दिशा देत आहेत आदर्शसंस्था म्हणून या संस्थांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल कर्मयोगी विद्यानिकेतन या प्रशालेने अल्पावधीतच आयोजित केलेला हा कार्यक्रम व त्याकरीता आयोजित केलेली व्यवस्था पाहून आयोजकांच्या कामाची कार्यपद्धती आदर्शवत असल्याचे दिसून येते याचा आम्हास अभिमान वाटतो.

            यावेळी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी कोळी गीत,धनगरी-गीत,लावणी,महाराष्ट्राची लोकधारा,हिन्दी,मराठी,सिनेमा गीते,बाल गीते इत्यादि प्रकारच्या कला सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. तर उपस्थित प्रेक्षकांनी ही भरभरून टाळ्यांचा प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या कला गुणांना मनमुराद दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा शिंदे,अनीता होणराव आदींनी केले. तर आभार प्रशालेच्या प्र.मुख्याध्यापिका रूपाली काळुंगे यांनी मानले.

 युटोपियन शुगर्स च्या वतीने महिलांकरिता दर वर्षी प्रमाणे मकर संक्रांती निमित्ताने हळदी-कुंकू व तीळ गूळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थी,पालक,उपस्थितीत सर्व महिला वर्ग आदीं करीता युटोपियन परिवाराच्या वतीने स्नेह भोजनाची सोय करण्यात आली होती. उपस्थित सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन संयोजकाकडून करण्यात आलेल्या चोख नियोजन व्यवस्थेचे कौतुक केले.

Pages