ढवळस येथे माजी सैनिकाचा अपघाती मृत्यू - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, January 8, 2019

ढवळस येथे माजी सैनिकाचा अपघाती मृत्यू


       मंगळवेढा / प्रतिनिधी
---------------------------------
   
     ऊस भरून उभारलेल्या ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने पाठीमागून मोटरसायकल स्वराने ठोकरल्याने गंभीर जखमी होऊन  मृत्यू झाला ही घटना मंगळवेढा पंढरपूर मार्गावरील ढवळस चौकात रात्री सव्वा आठ वाजता घडली आहे या अपघातात बाबासाहेब रामचंद्र हेंबाडे (वय 62 राहणार ढवळस )असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती यातील मयत बाबासाहेब हेंबाडे हे मूळचे ढवळस येथील असून ते मंगळवेढा येथे बागेवर फवारण्यासाठी लागणाऱे औषध आणण्यासाठी मंगळवेढा येथे गेले होते दि 8 जानेवारी रोजी औषध घेऊन रात्री सव्वा आठ वाजता एम एच 13 ए ए -25 71 या दुचाकीवरून ढवळस गावाकडे जात असताना ढवळस चौकात ऊस भरून एम एच 13 जे 5905 हा ट्रॅक्टर उभा होता .या ट्रॅक्टरच्या ट्रेलरला पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरचा मोटरसायकलस्वरास अंदाज न आल्याने पाठीमागून जोराची धडक बसल्याने गंभीर जखमी होऊन त्यामध्ये मोटरसायकल स्वार मयत झाले. बाबासाहेब हेंबाडे हे माजी सेवानिवृत्त सुभेदार असून ते मंगळवेढा शहरातील विद्यार्थ्यांना एन.सी.सी एम.सी.सी ते मार्गदर्शन करीत होते अपघाताचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक शाहूराज दळवी यांनी तात्काळ वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी अपघात ग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतुकीस मार्ग मोकळा करून दिला

Pages