पंढरपूर / प्रतिनिधी
---------------------------
पंढरपूर शहरातील के.बी.पी.कॉलेज चौक ते इसबावी-वाखरी हा रस्ता अतिशय रहदारी असून हा रस्ता अपघाती रस्ता म्हणून ओळखला जातो. गेल्या 6 महिन्यापासून या रस्त्यावर अपघातामध्ये 5 निष्पाप लोकांना निष्कारण आपले जीव गमवावे लागले आहेत. दोन दिवसापूर्वी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार श्री भारत भालके यांनी सदर अपघाती रस्त्याबाबत लक्ष घालून येथील स्थानिक नागरिक व संबंधित अधिकार्यांना बरोबर घेऊन या अपघाती रस्त्यावर प्रत्यक्ष जाऊन रस्त्यावर योग्य त्या ठिकाणी तातडीने गतिरोधक करण्याचे सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज दि.17.01.2019 रोजी सदर अपघाती रस्त्यावर गतिरोधक करण्याचे काम चालू झालेले दिसून येत आहे त्यामुळे या रस्त्यावर आता अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे