मंगळवेढा तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी निवडी जाहीर - Pantnagari Times

Breaking News

Friday, January 11, 2019

मंगळवेढा तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी निवडी जाहीरमंगळवेढा - मदार सय्यद

-----------------------------------

           मंगळवेढा तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे यांनी दिली आहे. मंगळवेढा तालुका शिवसेना शहरी व ग्रामीण भागातील पदाधिकारी निवडीबाबत मंगळवेढा येथील शिवसेना कार्यालयात 6 जानेवारी रोजी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी व इच्छुक शिवसैनिक यांची बैठक घेवून नावे सुचवण्यात आली होती. सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या आदेशाने या निवडी  करण्यात आल्या  आहेत. यामध्ये तालुका उपप्रमुखपदी दामाजी नगर जि. प. गट अरुण कुंडलिक मोरे (अरळी), हुलजंती जि. प. गट कृष्णा श्रीमंत सपकाळ (आसबेवाडी), लक्ष्मीदहिवडी जि. प. गट गंगाधर काशिनाथ मसरे, भोसे जि.प.गट संभाजी बबन खापे (नंदेश्वर) व शंकर खंडू भगरे (भोसे) यांचेसह विभाग प्रमुखपदी दामाजीनगर पं. स. गण सदाशिव मुरलीधर सरवळे (माचनुर), बोराळे पं. स.गण आण्‍णासो मारुती भोजने (बोराळे), हुलजंती पं. स. गण रमेश साधू चोपडे (हुलजंती), मरवडे पं. स. गण दयानंद कृष्णा ढावरे (येड्राव), चोखामेळा नगर पं. स. गण दीपक मच्छिंद्र आसबे (मारापुर), लक्ष्मी दहिवडी पं.स. गण हनुमंत आप्पा कोरे (पाठखळ), भोसे पं. स. गण दत्ता जालिंदर माने (हुन्नुर), रड्डे पं. स. गण दत्ता रावसाहेब टिके (सलगर बु.) यांची निवड करण्यात आली आहे. तसेच शहर उपप्रमुखपदी सतीश शिवाजी शिर्के, बापू मुरलीधर खराडे, गणेश शिवाजी कुराडे, रमेश पांडुरंग जाधव व विशाल प्रकाश इंगळे तसेच शहर विभाग प्रमुखपदी प्रकाश शंकर पवार, रमेश दादा ढगे, धनाजी मारुती गवळी, अमोल विजय राजमाने यांची निवड करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील ग्राहक संरक्षण कक्ष, महाराष्ट्र कामगार सेना, युवा सेना, विद्यार्थी सेना, शेतकरी सेना व महिला आघाडी या पदांच्या निवडीही लवकरच करण्यात येणार आहेत अशी माहिती तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे यांनी दिली आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांचे आ.तानाजी सावंत, जिल्हा समन्वयक शिवाजीराव सावंत, सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जिल्हा प्रमुख गणेश वानकर,जिल्हा प्रमुख  संभाजी शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे,विधानसभा संपर्क प्रमुख संतोष माने,पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष विजय कुलबरमे  उपजिल्हा प्रमुख तुकाराम भोजने उपजिल्हा प्रमुख  सुधीर अभंगराव शहर सन्मवयक नारायण गोवे सन्मवयक श्रीशैल कुभांर तालुका  शहर प्रमुख सुनिल दत्तू यांनी अभिनंदन केले आहे.

Pages