मंगळवेढा / प्रतिनिधी
-------------------------
शासनमान्य मंगळवेढा शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा. नागेश मासाळ तर साप्ताहिक संघटनेचे तालुका अध्यक्षपदी औदुंबर ढावरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
मंगळवेढा तालुक्यातील बातमी व जाहिरात साठी संपर्क साधा मो.नं.9834773995/9970090885
या बैठकीत सल्लागार पदी विलास मासाळ सचिव दावल ईनामदार खजिनदार पदी डाॅ.संदिप लिगाडे इलेक्ट्रॉनिक मिडीया सुनील कसबे बिरा करे,प्रवीण पाटील, सचिन हेंबाडे ,गणेश जाधव, समाधान फुगारे, आदि उपस्थितीत होते.
सुरूवातीला ज्येष्ठ पत्रकार प्रा.राम नेहवरे यांच्या शुभहस्ते मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या फोटोंचे पुजन करण्यात आले.उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.निवडीनंतर नुतन अध्यक्षाचा सत्कार संस्थापक अध्यक्ष संतोष मोरे,यांच्या हस्ते करण्यात आला.
पत्रकार दिनानिमीत्त पोलीस स्टेशन मंगळवेढा वतीने पोलिस निरीक्षक गाडे साहेब, आ.भालके संपर्क कार्यालय च्या वतीने विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर चे संचालक भगिरथ भालके , स्विय सहाय्यक रावसाहेब फटे संजीवनी हाॅस्पीटल डाॅ. विवेक निकम यावेळी सर्व पत्रकारांचे सत्कार करण्यात आले.