मंगळवेढा तालुका साप्ताहिक वृत्तपत्र संपादक संघटनेच्या अध्यक्षपदी समाधान फुगारे - Pantnagari Times

Breaking News

Sunday, January 6, 2019

मंगळवेढा तालुका साप्ताहिक वृत्तपत्र संपादक संघटनेच्या अध्यक्षपदी समाधान फुगारेमंगळवेढा तालुका साप्ताहिक वृत्तपत्र संपादक संघटनेच्या अध्यक्षपदी समाधान फुगारे
   मंगळवेढा / प्रतिनिधी
---------------------------

मंगळवेढा तालुका साप्ताहिक वृत्तपत्र संपादक संघटनेची बैठक संस्थापक दिगंबर भगरे यांच्या अध्यक्षतेखाली होवून संघटनेच्या अध्यक्षपदी समाधान फुगारे यांची निवड सर्वानुमते निवड करण्यात आली.

या बैठकीत उपाध्यक्षपदी सिद्धेश्वर पडवळे, कार्याध्यक्षपदी शिवाजी केंगार, सचिवपदी प्रमोद बिनवडे, खजिनदारपदी सुरेश केंगार, सहसचिवपदी परमेश्वर वाघमोडे, सहखजिनदारपदी मदार सय्यद, सल्लागारपदी रजाक मुजावर,  तानाजी चौगुले, तर सदस्यपदी अनंत तांबट, संभाजी मस्के आदिंची निवड करण्यात आली.

निवडीनंतर दिगंबर भगरे यांचे हस्ते नुतन अध्यक्ष समाधान फुगारे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अ‍ॅड.दत्तात्रय तोडकरी, भिमराव मोरे, बाळासाहेब जामदार, पत्रकार ज्ञानेश्वर भगरे, बाबासाहेब सासणे, विलास काळे, रामा सपताळे, दादा लवटे, प्रसाद कसबे,दत्तात्रय कांबळे व अनेक पत्रकार उपस्थित होते.

Pages