मंगळवेढा - प्रतिनिधी
----------------------------
मंगळवेढा तालुका पत्रकार संघाने समाज उपयोगी उपक्रम राबवून खर्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे प्रतिपादन जिल्हा गटसचिव संघटनेचे नेते प्रभाकर घुले यांनी केले.
मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अॅड.दत्तात्रय तोडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुका पत्रकार संघ, जिल्हा दैनिक पत्रकार संघ, मंगळवेढा तालुका साप्ताहिक संपादक संघटना व मंगळवेढा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी सकाळी 11 वाजता श्री दामाजी मंदिर येथे प्रभाकर घुले व फटेवाडीचे सरपंच राजेंद्र फटे यांचे हस्ते गोरगरीब व गरजूंना मोफत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे हे होते.यावेळी घुले म्हणाले, समाजातील प्रत्येक घडामोडींवर पत्रकारांचे लक्ष असते तसेच त्यांचे उपेक्षित घटकांवरही लक्ष आहे. जिथे कोणतीही मदत पोहचू शकत नाही अशा लोकांना थंडीच्या दिवसात मायेचा आधार म्हणून ब्लँकेटचे वाटप केले. खरोखरच हा उपक्रम स्तुत्य आहे. पत्रकारांच्या या कार्याचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे. यावेळी सत्कारमुर्ती अॅड.दत्तात्रय तोडकरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमप्रसंगी एकमेकांना तिळगुळ वाटप करून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे प्रास्तविक पत्रकार तानाजी चौगुले यांनी केले. सुत्रसंचालन राजेंद्रकुमार जाधव तर आभार प्रदर्शन भारत दत्तु यांनी केले.या कार्यक्रमास पत्रकार संघाचे संस्थापक दिगंबर भगरे, माजी अध्यक्ष शिवाजी पुजारी, बाबासाहेब सासणे, शिवाजी केंगार, अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, जिल्हा दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे, कार्याध्यक्ष विलास मासाळ, साप्ताहिक संपादक संघटनेचे अध्यक्ष समाधान फुगारे यांचेसह विलास आवताडे, शंकर हजारे, आनंदराव जावळे, भिमराव मोरे, माधव कुलकर्णी, दत्तात्रय कोरे, अॅड.पवार, अॅड.विकास माळी, अॅड.जावेद मुल्ला, अशोक शिंदे, संभाजी सावंजी, पिंटू माने, संजय माळी, हरिप्रसाद देवकर, प्रथमेश तोडकरी, प्रांजली तोडकरी, पत्रकार प्रल्हाद नाशिककर, मोहन वाले, संभाजी मस्के, दादासाहेब लवटे, लखन कोंडुभैरी आदि उपस्थित होते.