ग्रामपंचायत कर्मच्यार्याचे कर्मचार्‍यांना वेतनश्रेणी लागू करावी या मागणीसाठी चंद्रपुर येथे राजस्तरीय आंदोलन - Pantnagari Times

Breaking News

Thursday, January 17, 2019

ग्रामपंचायत कर्मच्यार्याचे कर्मचार्‍यांना वेतनश्रेणी लागू करावी या मागणीसाठी चंद्रपुर येथे राजस्तरीय आंदोलन


मंगळवेढा / प्रतिनिधी

-------------------------

ग्रामपंचायत कर्मच्यार्याचे राजस्तरीय आंदोलन
चलो चंद्रपूर ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना वेतनश्रेणी लागू करावी या मागणीसाठी मागील चार वर्षापासून महासंघाच्या वतीने विविध आंदोलनाच्या माध्यमातून शासन दरबारी संघर्ष सुरू आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना यावलकर समितीच्या अहवालातील शिफारसी मान्य करून वेतनश्रेणी लागू करा या मागणीसाठी अर्थमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील निवासस्थानासमोर शनिवार दिनांक 19 जानेवारी 2018 रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना वेतनश्रेणी लागू करावी या मागणीसाठी मागील चार वर्षापासून महासंघाच्या वतीने आंदोलनाच्या माध्यमातून शासन दरबारी संघर्ष सुरू आहे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना वेतनश्रेणी देण्याची प्रक्रिया म्हणून शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 ऑगस्ट 2017 रोजी वेतन निश्चिती समिती नेमण्यात आली तब्बल नऊ महिन्याच्या कालावधीनंतर राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या या समितीने आपले आम्हाला तील सकारात्मक शिफारशी मान्य करून त्याबाबतचा अमलबजावणीची उपाययोजना होणे आवश्यक होते परंतु ते अद्याप पर्यंत झालेले नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन वाढ वेतनश्रेणी पेन्शन लागू करणे तसेच आकृतिबंध रद्द करणे या एकूणच मागणीकरिता आर्थिक तरतूदही विभागाची संबंधित आहे म्हणूनच या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी लाल बावटा नेतृत्वखाली महासंघाच्या वतीने राज्याचे अर्थमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे सदरील मोर्चा रविवारी सकाळी ठीक 11 वाजता आजाद बगीचा येथून निघणार आहे या मोर्चात जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना अध्यक्ष तता सोलापूर जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड तानाजी ठोंबरे सर राज्य  सरचिटणीस कॉ नामदेवराव चव्हाण सर जिल्हा सरचिटणीस ए बी कुलकर्णी जिल्हा उपाध्यक्ष .कॉ अण्णा देवकते  तालुकाध्यक्ष लक्ष्मण ठेंगील कार्यध्यक्ष संतोष जामदार सचिव नवनाथ कांबळेआदींनी केले आहे


Pages