तुकाराम बाबा महाराज हे आधुनिक युगातील संत - संजय कांबळे - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, January 8, 2019

तुकाराम बाबा महाराज हे आधुनिक युगातील संत - संजय कांबळेजत / प्रतिनिधी
-----------------

            समाजिक समता न्याय व्यवस्थेला प्राध्यान देणारे ,व जत तालुक्यात दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकर्यासाठी चारा छावणाची संकल्पना,व दुष्काळात पाण्याच्या टाक्या वाटप करणारे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा  महाराज हे आधुनिक युगातील संत असल्याचे उदगार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पश्चिम महाराष्ट्र चे उपाध्यक्ष संजय कांबळे यांनी केले.ते जत येथील पत्रकारांना पाण्याची टाकी सुपूर्द केली.यावेळी ते बोलत होते.
       यावेळी चिकलगी भुयार चे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज , एसबीएन न्यूजचे सोमनिंग कोळी,मोकाशेवाडीचे सरपंच आण्णासाहेब गायकवाड ,नवज्योत अॅग्रोटेक चे लिंबाजी सोलनकर ,महावितरणचे कार्यकारी अभियंता सानप साहेब ,मानवधिकारी संघटनेचे पुणे अध्यक्ष संजय  धुमाळ साहेब,दत्ता सावळे, नजीरभाई चट्टरकी,बसवराज बिराजदार मारोळी , विलास बाबर आदी उपस्थित होते .
            कांबळे म्हणाले की ,माडग्याळ येथे प्रकाशराव जमदाडे युथ फौडेशने आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात तुकाराम बाबानी पत्रकार हे नेहमीच सामाजिक बांधलिकी जोपसातात .त्याकरिता १५८दिवस दुष्काळ संघर्षाचा याअंतर्गत पाण्याची टाकी देण्याचे आश्वासित केले होते .अगदी दोन दिवसातच दैनिक पुढारी चे जत  प्रतिनिधी विजय रुपनूर यांच्याकडे ही टाकी सुपूर्द केलेली आहे .यापूर्वी तुकाराम बाबांनी यल्लमा यात्रेत व गुड्डापूर येथील यात्रेत भाविकांना पाणी वाटप केला आहे.
यावेळी तुकाराम महाराज महाराज म्हणाले  जत तालुक्यात दुष्काळाची भयावह परिस्थिती उदभवली आहे.त्याकरिता दुष्काळग्रस्ताना दिलासा देणार आहे.संख येथे चालू होणार्या मोफत चारा छावणी करिता जनावरांची  नोंदणी करावी असेही आवाहन यावेळी केले. पहिल्या टप्प्यात  पाणी टाकी व्हसपेठ ,दरिबडची ,कोतेबोबलाद ,करेवाडी ,बालगाव ,संख ,अंकलगी या गावात जावून जनतेची मानसिकता तयार करुन उपलब्ध पाणी ठिकाणी गावात पाणी टाकी ठेवून  पाणी  देणार असल्याचे सांगितले. Za

Pages