मंगळवेढा / प्रतिनिधी
महाराष्ट्रासह आंध्र कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धापूर येथील मातुलिंग गणपतीची यात्रा बुधवार दिनांक16 जानेवारी रोजी
संपन्न होत आहे. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट समितीचे अध्यक्ष भिमगोंडा नांगरे- पाटील व कल्लाप्पा मलगोडे- पाटील यानी दिली. भीमा नदीच्या पात्रात प्रगट झालेली गणपती स्वयंभू मूर्ती असून नवसाला पावणारा बाळ गणपती म्हणून प्रसिद्ध आहे तो तिने धारेच्या मध्यावर वसलेला असून दरवर्षी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रातिस मोठी यात्रा भरते लाखो भाविक दर्शनासाठी कर्नाटक,आंध्र,महाराष्ट्र राज्यातुन
भक्ती भावे येतात. सिद्धापूर गावापासून तीन किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या पात्रात स्वयंभू गणपतीची मूर्ती चे मंदिर आहे सध्या भीमा नदीला पात्रात पाणी नसल्यामुळे देवस्थान पासून नदीपात्रामध्ये कॉंक्रिटीकरण करून भाविकांना दर्शनाची जाण्यासाठी दुहेरी रस्ता युद्ध पातळीवर निर्माण करण्यात आला आहे मंदिर समितीच्या ट्रस्टकडून भाविकांना श्री चे दर्शन सुलभ व्हावे म्हणून स्वयंभू गणपतीच्या बाजूस दर्शन घेणारी रांग व दर्शन घेऊन जाणारे भाविक ब अशी दुतर्फा मार्ग बनवला आहे यात्रा ठिकाणी भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी व्यवस्था, आरोग्य सुविधा,यात्रेत भाविकाना धुळीचा त्रास होऊने
म्हणुन मंदीर परीसर व यात्रापरीसर धुळविहीरीत करण्यात आला आहे.सिध्दापुर ग्रापंचायतकडुन गेल्या तिन वर्षासुन यात्रेत येणार्याव्यापरी फेरीवाले कडुन जागाभाडेपट्टी घेण्यात येत नाही वाहनाची पार्कीग व्यवस्था यात्रापरीसरात लाईट दीवे उपलब्ध करून दीले जातात. यात्रा कालावधीमध्ये मंगळवेढा पासून सिद्धापूर व माचनूर ते सिद्धापूर राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी बसची सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे यात्रे दिवशी बुधवारी उत्सव मूर्ती गावातून वाजत गाजत मातुलिंग यात्रा स्थळावर मार्गस्थ होते दिनांक 16 जानेवारी रोजी पहाटे सहा वाजता श्री ची महापूजा माननीय ना श्रीविजयकुमार देशमुख मालक( पालकमंत्री व वस्त्रउदयोगमंत्री महाराष्ट्रराज्य) माननीय श्री सुधाकर परिचारक याच्या शुभहस्ते होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार भारत नाना भालके राहाणार आहेत. प्रमुख पाहुणे समरजितसिंह घाटगे माननीय लक्ष्मण ढोबळे विजयसिंह राजे पटवर्धन खासदार शरद बनसोडे रविकांत तुपकर बबनरावजी अवताडे समाधान आवताडे श्री अंबादास कुलकर्णी बळीराम काका साठे शैलाताई गोडसे मनोज पाटील साहेब ( सोलापुरजिल्हा D.S.P)डाॅ. राजेंद्र भोसले (जिल्हाआधिकारी) राजेंद्र भारूड साहेब (C.E.O) प्रमोद गायकवाड साहेब (प्रांतसाहेब) आप्पासाहेब समिंदर साहेब (तहसिलदार) जगदाळे साहेब(D.Y.S.P) जिल्हा व तालुक्यातील पदसिध्द पधाधिकारी सिद्धापूर ग्रामस्थ भाविक उपस्थित राहाणार आहेत. सांगलिसंस्थानकडुन भक्तगनााना महाप्रसादाचे वाटपहोणार आहे.यात्राकालावधीमध्ये अनुचितप्रकार घडुने म्हणुन P.I गाडेसाहेबाच्या मार्गदर्शनाखाली A.P.I वैभव मारकडसाहेब आपल्या पोलिस सहकारीसमवेत चोखपोलिसबंदोबस्त ठेवणार आहेत. संध्याकाळी श्रीच्या पालखीसमोर गांवात शोभेचे अतिषबाजी करण्यात येणार आहे. रात्री 9.30 वाजता भाविकाच्या मनोरंजनासाठी कन्नड सामाजिक नाटक "चिन्नद गोंबे"चे सादरीकरण मातृलिंग मंदीर ट्रस्टच्यावतिने होणार असल्याची माहीती खजिनदार प्रकाश तळ्ळे सर यांनी दीली.यात्रा यशस्वी करण्यासाठी
सिध्दापुरग्रामस्थ परीश्रम घेत आहेत.