मंगळवेढा / प्रतिनिधी
-------------------------
आज दिल्ली येथे खासदार शरद बनसोडे यांनी विजापूर ते पंढरपूर ते लोणंद या कामाला लवकर सुरुवात करण्याचे निवेदन दिले
आज दिल्ली येथे संसदेत पंढरपूर ते विजापूर व पंढरपूर ते
लोणंद या कामाला लवकर सुरुवात करण्याचे निवेदन
खासदार शरद बनसोडे यांनी दिले रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना भेटून सविस्तर चर्चा केली पंढरपूर ते विजापूर व पंढरपूर ते लोणंद या रेल्वे लाईन साठी सर्वे पूर्ण झाला असून सदर काम प्रत्यक्षात चालू करण्यासाठी गती मिळावी व विजापूर ते लोणंद हा मार्ग चालू झाला तर वरील सर्व भागातील नागरिकांना याचा लाभ होणार असून वेळ सुद्धा वाचणार आहे. सदर कामामधे मी लक्ष्य घालून ते मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करतो आसे आश्वासन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिले आले या मुळे या कामाला नक्की गती येणार आहे. यावेळी भाजपा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शशीकांत चव्हाण, पंढरपूर भाजपा जेष्ठ नेते उमेश वाघोलीकर, अल्पसंख्याक आघाडी तालुका अध्यक्ष सैफन शेख, युवा मोर्चाचे सागर ननवरे, चंद्रशेखर राजमाने, गजानन देशमुख उपस्थित होते.