मंगळवेढा / प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समितीची मंगळवेढा येथील दैनिक दामाजी एक्स्प्रेस कार्यालयात बैठक घेण्यात आली सदरची बैठक दैनिक दामाजी एक्स्प्रेस चे संपादक दिगंबर भगरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येऊन पत्रकार सुरक्षा समितीच्या पंढरपूर विभाग जिल्हा अध्यक्षपदी बाबासाहेब सासणे यांची एकमताने निवड करण्यात आली
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी निवडीचे पत्र दिले आहे
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला तसेच नूतन जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब सासणे यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला
यावेळी तानाजी चौगुले संभाजी मस्के पत्रकार सुरक्षा समितीचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष मोहन माळी मंगळवेढा पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे समाधान फुगारे प्रमोद बिनवडे दत्ता कांबळे बाळासाहेब जमादार दादासाहेब लवटे लखन कौंडूभेरी सोलापूर शहर संपर्क प्रमुख वैजिनाथ बिराजदार बाबा काशीद उपस्थित होते