हुन्नूर येथे व्हीव्हीपॅट वोटिंग मशीन चे प्रात्यक्षिक - Pantnagari Times

Breaking News

Monday, January 7, 2019

हुन्नूर येथे व्हीव्हीपॅट वोटिंग मशीन चे प्रात्यक्षिक


         
मंगळवेढा / मदार सय्यद

      हुन्नूर ता. मंगळवेढा येथे व्ही व्ही पॅट वोटिंग मशीन चे प्रात्यक्षिक गावकामगार तलाठी कार्यालयात दाखवण्यात आले. निवडणुकीदरम्यान मतदारांनी आपण केलेले मतदान त्याच उमेदवाराला किंवा त्याच चिन्हाला मिळाले किंवा नाही हे समजण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान यंत्रांमध्ये सुधारणा करून मतदारांना आपण केलेले मतदान पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याची मतदारांना माहिती व्हावी यासाठी गावोगावी फिरून या मशीनचे प्रात्यक्षिक सध्या महसूल चे कर्मचारी करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून हुन्नूर येथे उपस्थित ग्रामस्थांना प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
 

बातमी  जाहिरात साठी संपर्क साधा मो.नं-9834773995/9970090885

          यावेळी सरपंच शशिकांत काशीद सुरेश चव्हाण,शाहीर यशवंत खताळ,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते संदीप पवार ,भगवान माने,एन.डी.भोसले,शंकर पुजारी, विजय चव्हाण, पोलीस पाटील लक्ष्मण इंगोले, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मंडलाधिकारी एस. एन.घुगे,  तलाठी डी.बी.मोरे, जे.के.कल्लाळे, या महसूलच्या कर्मचाऱ्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच नागरिकांनी विचारलेल्या शंकांचे समाधान केले.

Pages