मंगळवेढा / प्रतिनिधी
खुपसंगीच्या कामसिद्ध व पाठखळ च्या सिद्धनाथाला भेटायला सिद्धरामेश्वरांचे नंदीध्वज येणार
सोलापूर चे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेमध्ये मानाची मानले जाणारे नंदीध्वज याही वर्षी खुपसंगी गावच्या श्री कामसिद्धास भेटावयास येणार आहे.
शुक्रवार दि.४ जानेवारीला सकाळी ९ वाजता पाठखळ सिध्दनाथ मंदिर व ११ वाजता खुपसंगी त नंदी ध्वजाचे (काठीचे) आगमन होणार असून त्याबरोबर आलेल्या भक्त गणाबरोबर ग्रामस्थ भाविकांच्या उपस्थितीत गावातून मिरवणूक निघणार आहे.
या नंदीध्वज सोहळ्यास ग्रामस्थ भाविकांनी उपस्थित राहून अपल्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत खुपसंगी व पाठखळ तर्फे केले आहे.त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.