बीड येथे  ३१ जानेवारी रोजी माळी समाजाचा राज्यस्तरीय जाहिर मेळावा - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, January 29, 2019

बीड येथे  ३१ जानेवारी रोजी माळी समाजाचा राज्यस्तरीय जाहिर मेळावा बीड ते 31 जानेवारी रोजी माळी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा .पंकजाताई मुंडे व कल्याण आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा संपन्न होणार


पंढरपूर - प्रतिनिधी 

सावता परिषद आयोजित गुरूवार दि.31 जानेवारी रोजी बीड येथे श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा स्टेडीयम मैदानावर माळी समाजाच्या राज्यस्तरीय जाहिर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंगळवेढा सावता परिषद अध्यक्ष सयाजी बनसोडे यांनी दिली. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी ओ.बी.सी.नेत्या तथा राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे उपस्थित राहणार असून जिल्हयाच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे ही उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.  


सावता परिषदेच्या धोरणानुसार प्रत्येक तीन वर्षाला संघटनेच्या त्रैवार्षिक अधिवेशन व माळी समाज मेळ्याव्याचे आयोजन करण्यात येते. यानुसार होणाया या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे राहणार असून या प्रसंगी आ.भिमराव धोंडे (बीड), आ.अतूल सावे (औरंगाबाद), आ.जयकुमार गोरे (सातारा), आ.योगेश टिळेकर (पुणे),आ.मनिषा चौधरी(मुंबई) आ.देवयानी फरांदे (नाशिक),कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या सह भास्कर आंबेकर ,शंकर बोरकर,दिलीप थोरात, सुहास सिरसाट, तुषार वैद्य, बाळासाहेब माळी, रामप्रसाद थोरात , बाबुराव दुधाळ,सुशिल जवंजाळ,राजेंद्र गिरमे,संजय साडेगावकर ,रंगनाथ धोंडे,आसाराम तळेकर,आजीनाणाआहे. सावता महाराजांचे वंशज श्री रमेश महाराज वसेकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.बीड येथे माळी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा प्रथमच होत असल्यामुळे महाराष्ट्रातील समस्त माळी समाजात या मेळाव्याविषयी प्रचंड उत्सुकता असूूून राज्याच्या कानाकोपन्यातून विविध भागातील  हजारो च्या संख्येने  माळी समाज बांधव सहभागी होणार आहेत. हा मेळावा माळी समाजाचे शक्तीप्रदर्शन ठरेल अशा पध्दतीचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी सावता परिषदेचे कार्यकर्ते व माळी समाज बांधव परिश्रम घेत आहेत.

Pages