भीमा - कृष्णा स्थिरीकरण योजनेसंदर्भात केंद्र सरकार राज्य सरकार कडून अहवाल मागविणार - Pantnagari Times

Breaking News

Thursday, January 3, 2019

भीमा - कृष्णा स्थिरीकरण योजनेसंदर्भात केंद्र सरकार राज्य सरकार कडून अहवाल मागविणार


मंगळवेढा / प्रतिनिधी
------------------------

कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसंदर्भात केंद्र सरकार राज्य सरकारकडून अहवाल मागवणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
 जलसंपदा ,नदी विकास व गंगा पुनरुज्जीवनमंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी त्यांची  ( दि. ३ )नवी दिल्ली येथे भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन दिले असता गडकरी यांनी अहवाल मागवण्याचे लेखी आदेश काढले आहेत. राज्यातील ६ जिल्हे व३० तालुक्यांसाठी वरदान ठरणारी कृष्णा-भीमा स्थिरीकरण ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील  हे गत बारा वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत
.सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद ,बीड, सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यांसाठी महत्त्वपूर्ण असणारा हा प्रकल्प राजकीय अनास्थेपोटी रखडला गेला आहे. तो प्रकल्प किती महत्त्वाचा आहे हे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज नितीन गडकरी यांना पटवून दिले. महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांच्या अधिकाऱ्यांची आपल्या स्तरावर बैठक आयोजित करून स्थिरीकरण प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी चर्चा व्हावी अशी मागणी मोहिते-पाटील यांनी गडकरी यांच्याकडे केली. तेंव्हा आपण महाराष्ट्र सरकारकडून यासंदर्भातील अहवाल मागवत असल्याचा शब्द नितीन गडकरी यांनी दिला .तशा लेखी सूचनाही त्यांनी राज्याच्या जलसंपदा मंत्रालयाकडे केल्या आहेत त्यामुळे हा रखडलेला प्रकल्प पूर्ण होण्यासंदर्भातील आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.
 भीमा व मान नदीच्या खोऱ्यात आवश्यकतेपेक्षा खूप कमी पाणी उपलब्ध होते तर कृष्णा व कोयना नद्यांच्या खोऱ्यात गरजेपेक्षा मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होतो. येथिल अधिकचे पाणी कर्नाटका व आंध्रात वाहून जाते ते पाणी भीमा नद्यांच्या खोर्‍यात आणले तर येथील जल संकट कायमचे संपेल .दुष्काळी भागातील टेंभू, ताकारी म्हैसाळ , भिमा, निरा या प्रकल्पामध्ये कमी पडणाऱ्या पाण्याची भर भरून काढण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री असताना ही योजना मंजूर करून घेतली आहे .यानुसार भीमा खोऱ्यातील पाणी मराठवाड्यात नेहण्याची कामे सुरू झाली आहेत मात्र कृष्णा खोऱ्यातून  भिमा खोऱ्यात पाणी आणण्याची कामे अद्याप सुरू झाली नाहीत. यामुळे सोलापूर जिल्ह्यात प्रचंड अस्वस्थता आहे .भीमा प्रकल्पाचा नियोजित पाणीवापर ८५ टीएमसी आहे. येथील उपयुक्त साठा केवळ ५५ टीएमसी इतकाच आहे. सध्या येथील  पाण्याचा वापर शंभर टक्के होतो .सोलापूर जिल्ह्यातील ९ पाणी पुरवठा योजना पुढील तीन वर्षांत कार्यान्वित होतील. त्यावेळी उजनीवर आणखी २५  टीएमसी चा भार पडणार आहे त्यावेळी मोठी पाणी टंचाई भासणार आहे .भीमेच्या लाभ क्षेत्रात दोन लाख हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे यावर गंभीर दुष्परिणाम होतील .या सर्व बाबी खासदार विजयसिंह मोहिते - पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास दिल्या आहेत.
खासदार विजयसिंह मोहिते -पाटील ,माढा लोकसभा
तत्कालीन केंद्रीय जलसंपदा मंत्री  उमा भारती यांनी राज्य सरकारने अद्यापपर्यंत या योजनेचा अहवाल केंद्राकडे पाठवला नसल्याचे आपणास सांगितले होते. त्यासाठी आता आपण केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. गडकरी यांनी अहवाल मागून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Pages