महाराष्ट्रातील पहिली मोफत चारा छावणी आजपासून संख येथे चालू ह.भ.प.तुकाराम महाराज - Pantnagari Times

Breaking News

Saturday, January 19, 2019

महाराष्ट्रातील पहिली मोफत चारा छावणी आजपासून संख येथे चालू ह.भ.प.तुकाराम महाराज


महाराष्ट्रातील पहिली मोफत चारा छावणी आज पासून  संख येथे चालू - ह.भ.प तुकाराम महाराज

जत / प्रतिनिधी

  दुष्काळाशी सामना करण्याच्या उद्देशाने संकल्प १५८ दिवस दुष्काळाचा” हा उपक्रम राबवताना शासनाची कोणतीही मदत न घेता मोफत चारा छावणी ची तयारी पुर्ण करण्यात येत असून नियोजनाप्रमाणे आज रविवार दिनांक जानेवारी २० पासून चारा छावणी चे सुरू  करण्यात येणार असल्याची माहिती हरी भक्त परायण तुकाराम महाराज यांनी पञकार बैठकीत दिली.गोंधळेवाडी ता.जत येथील त्यांच्या आश्रमावर पञकार परिषद घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते संख- जत या मार्गावर यांचे आश्रम आहे त्यांच्या स्व:त च्या मालकीची १८ एकर वडीलार्जित शेत जमीन आहे त्या ठिकाणी चारा छावणीत येणाऱ्या जनावरासाठी सावली व्हावी म्हणून छत उभे करण्याचे काम युद्ध पातळीवर चालु आहे जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी त्यांच्याच आश्रमाच्या जागेत असणाऱ्या ०७ कुपनलीकेमधुन पाणी उपसा करुन ते पुर्ण पाण्याची एकत्र साठवुन मोठया टाकीत सोडण्यात येणार आहे आहे महाराष्ट्र सरकारला हेवा वाटावा अशी व्यक्तिगत रित्या स्वखर्चातुन तुकाराम महाराज यांनी महाराष्ट्रात पहिली मोफत चारा छावणी चालविण्याचे एक आदर्श निर्माण करुन जनावरांच्या मालकामध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे मदतीसाठी अनेक भाविक ही स्वखर्चाने काम करण्यासाठी पुढे सरसावले आहेत महाराष्ट्र राज्यतील पहिली चारा छावणी आहे.मदतीसाठी पुणे जिल्हा मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष संजय धुमाळ यांच्या सह अनेक भाविक ही स्वखर्चाने मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. सरपंच राजाराम लकडे यांनी ही स्व:तच्या वाहण चारा वाहतुकीसाठी देवून जनावरांच्या सोबत येणाऱ्या शेतकऱ्यांना जेवणाची सोय सरपंच यांनी स्वखर्चातुन केले आहे. ह.म.प.तुकारामबाबा महाराज यांनी राजाराम लकडे यांचे ही ऋण या वेळीं व्यक्त केले सुमारे १हजार जनावरा साठी चारा कर्नाटकातुन उपलब्ध करणार असल्याचे महाराज यांनी सांगितले तसेच तहानलेल्या जनते साठी १४१ सिटेंक्स टाक्यांचे वाटप करण्यात आले असुन आणखीन गरज पडल्यास सिटेक्स टाक्या पुरवण्याची आपली तयारी आहे अशी माहिती यावेळी ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज यांनी  दिली

Pages