मंगळवेढा / मदार सय्यद
--------------------------------
मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर सिदा वाघमोडे यांनी दुष्काळग्रस्त भागातील टंचाई उपायोजना चारा,पाणी,रोजगार, २४गावे कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर व्हावी व खडकी येथील काटेरी चिलारीने वेढलेला साठवण तलाव चिलारमुक्त व्हावे यासाठी खडकी येथील सतीमाता मंदिरामध्ये गेली पाच दिवस उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला विविध संघटनांनी, 19 ग्रामपंचायतीने या भागातील प्रतिष्ठित नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शविला होता, तसेच मंगळवेढा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार यांनी भेट देऊन त्यांच्या मागणीचे निवेदन वरिष्ठ कार्यालयाशी पाठपुराव्यासाठी पाठवू असे आश्वासन दिले होते. परंतु वाघमोडे यांनी उपोषण मागे घेतले नाही आज माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना या उपोषणा संदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दूरध्वनीवरून वाघमोडे यांच्याशी संपर्क साधून उपोषण मागे घेण्यास विनंती केली या विनंतीला मान देऊन परमेश्वर वाघमोडे यांनी तात्पुरते उपोषण मागे घेत आहे असे जाहीर केले. यावेळी केंद्रीय मंत्री शिंदे यांनी वाघमोडे यांना दूरध्वनीवरून सांगितले की तुमची - आमची मागणी एकच आहे.तुम्ही-आम्ही सरकारशी भांडतो आहोत परंतु किती आंदोलन आणि उपोषण केले तर हे शासन सहकार्य करणारे दिसत नाही त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली, यावेळी माजी केंद्रीय मंत्री शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश कोळेकर यांनी वाघमोडे यांना सरबत देऊन उपोषण सोडण्यास विनंती केली.यावेळी सरपंच रघुनाथ बेलदार, सोसायटी चेअरमन सखाराम बेलदार,सुदर्शन महाराज खडकी,ग्रा.सदस्य दुर्योधन कसबे,आंबादास कांबळे,भारत कसबे,दत्तात्रय करे,दादाभाई शेख केराप्पा कसबे व ग्रामस्थ अदि उपस्थित होते.