पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार निवडून आणण्यासाठी कामाला लागा..... शिवाजीराव सावंत - Pantnagari Times

Breaking News

Thursday, January 24, 2019

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार निवडून आणण्यासाठी कामाला लागा..... शिवाजीराव सावंतपंढरपूर / प्रतिनिधी

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढा आणि पंढरपूर शहरांमध्ये 51 शिवसेना शाखांचे पुनर्घटन आणि उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले होते यामध्ये पंढरपूर शहरांमध्ये 30 शाखांचे उद्घाटन 23 जानेवारी 2019 रोजी सोलापूर जिल्हा शिवसेना समन्वयक माननीय शिवाजीराव सावंत यांच्या शुभ हस्ते आणि सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ शैला गोडसे मा.जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव  इत्यादींच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला

यावेळी बोलताना शिवाजी सावंत म्हणाले की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघा पासून शिवसेनेच्या पुनर्बांधणीला सुरुवात झालेली आहे अशाच पद्धतीने गावागावात आणि घराघरात शिवसेना पोहोचवण्याचं काम शिवसैनिकांनी करायचा आहे संघटनात्मक बांधणीला महत्त्व देऊन संघटनेच्या जोरावर या भागातील आमदार हा शिवसेनेचाच झाला पाहिजे असा संकल्प बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त करण्यात आला यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैलाताई गोडसे यांनी संघटना बांधण्याच्या कामाला चालना दिलेली असून निश्चितपणानं या संघटनात्मक बांधणीचा उपयोग पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचा आमदार निवडून आणण्यासाठी होणार असल्याचे प्रतिपादन शिवाजी सावंत यांनी केले सध्या मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला असून ठिकठिकाणी जनावरांना चारा पिण्यासाठी पाणी मिळवून देण्यासाठी शासनाकडे शिवसेनेच्या वतीने पाठपुरावा करावा तसेच दुष्काळाची तीव्रता जास्त असलेल्या भागांमध्ये शिवसैनिकांनी जातीने लक्ष घालून नागरिकांना मदत करावी असे आव्हान  शिवाजी सावंत यांनी शिवसैनिकांना केले

यावेळी सह संपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील जिल्हा प्रमुख  संभाजी शिंदे महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ शैलाताई शैला गोडसे संजय घोडके यांनीही मार्गदर्शन केलं प्रास्ताविक शहर प्रमुख रवींद्र मुळे यांनी केले

तत्पूर्वी पंढरपूर शहरातील पहिल्या शाखेचे उद्घाटन तीन वाजता करण्यात आले त्यानंतर एकापाठोपाठ एक असे करत शिवसेनेच्या वतीने मोटरसायकल रॅली काढत एकूण तीस शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले शेवटच्या शाखेच्या जवळ शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी सभा घेण्यात आली या उद्घाटन सोहळ्यालामा.उपजिल्हा प्रमुख  चरणराज चवरे तालुका प्रमुख महावीर देशमुख मंगळवेढा तालुका प्रमुख तुकाराम कुदळे शहर प्रमुख  रवी मुळे विनोद कदम  शहर सन्मवयक  नारायण गोवे  शहर प्रमुख  सुनील दत्तू  जयवंत माने नितीन शेळके अविनाश वाळके सुनील केदार महेश कदम बाबा अभंगराव लंकेश बुरांडे सचिन बंद पट्टे विनायक वनारे वैभव बडवे गणेश वाघमारे तानाजी मोरे  सिद्धू कोरे सुरज गायकवाड पप्पू पितळे पिंटू गायकवाड माऊली  अष्टेकर काका बुराडे वैभव ननवरे नागेश जाधव अर्जुन भोसले गणेश दांडगे संपत्ती घोडके रमेश जाधव अनिल कांबळे स्वप्निल गावडे विशाल जाधव गणेश घाडगे महावीर अभंगराव अनिल कांबळे मुन्ना माने महेश मेहर पंकज डांगे इत्यादी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pages