सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच मुली अनेक क्षेत्रामध्ये आघाडीवर – आ.भारतनाना भालके - Pantnagari Times

Breaking News

Saturday, January 5, 2019

सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच मुली अनेक क्षेत्रामध्ये आघाडीवर – आ.भारतनाना भालके
मंगळवेढा / प्रतिनिधी
------------------------

     डोंगरगाव येथे आयोजित केलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय मुलींचे हितगुज मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय विद्यार्थीनी प्रणाली डांगे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रेया माळी उपस्थित होत्या. व्यासपीठावर पं.स.सदस्या उज्वला मस्के, पं.स. विरोधी पक्षनेते नितीन पाटील,सचिन शिंदे कैलास कोळी आदि उपस्थित होते.
केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज समाजातील मुली मुलांपेक्षाही अनेक क्षेत्रामध्ये आघाडीवर असल्याचे दिसून येत असून महिलांचा सन्मान होत असल्याचे प्रतिपादन आ.भारत भालके यांनी केले.

जाहिरात साठी संपर्क साधा
मो. नं - 9834773995/9970090885

आ.भालके पुढे म्हणाले, अठराव्या शतकात शिक्षणाचा यज्ञकुंड सावित्रीमाईंनी मांडला त्यांना अनेकदा अपमान सहन करावा लागला मात्र मुलींना शिक्षण देण्यासाठी क्रांतिकारी कार्य केले शासनाने शिक्षण निधी, सिंचन निधी, कृषी निधी यावर संक्रांत आणल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शिक्षण हा समाजाचा मुळ घटक असल्याने याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शासनाने याकडे गांभीर्यपूर्वक पाहून मुलांना बसण्यासाठी वर्ग आदिंची व्यवस्था केली पाहिजे. डोंगरगाव येथे केंद्रीय शाळा असूनही येथे पाच वर्गाची कमतरता आहे. पालकांनी आमदार फंडातून वर्ग खोल्या बांधण्याची मागणी यावेळी केली मात्र आ.भालके यांनी आमदार निधीतून वर्गखोल्या बांधता येत नसून साहित्याची मागणी करा मी त्यासाठी निधी देतो असे ग्रामस्थांना यावेळी आश्वासन दिले. कार्यक्रम सुरू असतानाच आ.भालके यांनी वर्ग खोल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारूड यांचेशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. यावेळी भारूड यांनी येथे दोन खोल्या बांधून दिल्या जातील असे अभिवचन दिल्याचे आ.भालके यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणी बालिका श्रेया माळी हिने मी सावित्रीबाई बोलतेय ही नाटिका सादर केली. कार्यक्रमापुर्वी चव्हाण यांनी योगासन तर दत्तात्रय येडवे व अमृता कुलकर्णी यांनी गीतमंच हा कार्यक्रम सादर केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र गटशिक्षणाधिकारी बजरंग पांढरे यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व शाळातील महिला शिक्षक, विस्तारअधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते सुत्रसंचालन भिमाशंकर तोडकरी यांनी केले.

Pages