तहसीलदार रणवरे यांना वठणीवर आणले शिवाय स्वस्थ बसणार नाही- अजित कुलकर्णी
सोलापूर / प्रतिनिधी
---------------------------
आज-काल अधिकारी हे जनतेचे सेवक असून सुद्धा राजें सारखी वागणूक देऊन नागरिकांना वेठीस धरण्याचे काम करू लागले आहे उत्तर तहसील कार्यालयात अनेक नागरिकांचे अनेक प्रकरणे प्रलंबित असताना याबाबत सतत पाठपुरावा करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज तहसीलदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत आहे उद्या जर तहसीलदार महोदय नागरिकांशी व्यवस्थित वागणुक दिला नाही तर त्यांना वाठणीवर आणल्या शिवाय सोडणार नाही आणि त्यांना शहरात कुठेही फिरू देणार नाही असा इशारा प्रहार संघटनेचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी दिला आहे.
कार्यालयाच्या दप्तराची तपासणी करून दप्तर जप्त करा- जमीरभाई शेख
तहसीलदार विनोद रणवरे यांच्या संपूर्ण मालमत्तेची चौकशी करून त्यांनी आजतागायत केलेले सर्व कामांची तपासणी केल्यास मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बाहेर आल्याशिवाय राहणार नाही आज ही कार्यालयात अनेक प्रकरणे टेबलाखाली दाबून ठेवण्यात आले त्यांच्या कार्यालयाचा संपूर्ण दप्तर जप्त करून तपासणी केल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याशिवाय राहणार नाही असे मनोगत शहर संपर्कप्रमुख जमीर भाई शेख यांनी व्यक्त केले .
प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने उत्तर तहसील कार्यालयासमोर जनता दरबार व उपोषणाच्या आयोजन केले होते सदर उपोषणास अनेक नागरिकांनी येऊन आपले गार्हाणे मांडले व प्रशासकीय स्तरावर होत असलेल्या अन्यायाची किस्से सांगितले .
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आंदोलनाची दखल
तसेच संघटनेकडे लेखी स्वरूपात अनेकांनी तक्रारी दिल्या सदर आंदोलनाची दखल घेत सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवून 15 दिवसाच्या आत तहसीलदारांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले.
सदर आंदोलनात जिल्हाप्रमुख दत्तत्रय मस्के पाटील शहर कार्याध्यक्ष खालीद मनियार ,संभाजी व्हनमारे, आयात शेख, संजीवनीताई बारांगुळे,फातिमा बेग मॅडम, मुश्ताक शेतसंधी, उत्तर तालुकाप्रमुख विशाल सपकाळ,जावीद मणियार, मुदस्सर, सिद्धाराम काळे आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते