मातृलिंग गणपती यात्रेत अवतरला भक्तचा महापुर मातृलिंग गणपती परिसर विकास करण्यासाठी प्रयत्न करणार - विजयकुमार देशमुख पालकमंत्री - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, January 16, 2019

मातृलिंग गणपती यात्रेत अवतरला भक्तचा महापुर मातृलिंग गणपती परिसर विकास करण्यासाठी प्रयत्न करणार - विजयकुमार देशमुख पालकमंत्री


मंगळवेढा / मदार सय्यद

-------------------------------

  तालुक्यातील सिद्धापूर येथील स्वयंभू मार्तुलिंग गणपती यात्रेच्या महापूजेनंतर देवस्थान ट्रस्ट वतीने आयोजित केलेल्या सत्कारानंतर ते बोलत होते.सुर्योदया ते सुर्यास्त पर्यंत भरणाय्रा यात्रेची महापुजा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते विधीवतपणे करण्यात आली.

- कुडल संगमच्या धर्तीवर मातृलिंग गणपती देवस्थानचा परिसर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालक मंत्री विजयकुमार देशमुख यांनी कार्यक्रमास्थळी दीली.

तालुक्यातील सिद्धापूर येथील स्वयंभू मार्तुलिंग गणपती यात्रेच्या महापूजेनंतर देवस्थान ट्रस्ट वतीने आयोजित केलेल्या सत्कारानंतर ते बोलत होते.सुर्योदया ते सुर्यास्त पर्यंत भरणाय्रा यात्रेची महापुजा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते विधीवतपणे करण्यात आली. ही पुजा वेदपंडीत नंदकुमार कुलकर्णी याच्या मार्गदर्शनाखाली मंत्रोपठनाने पार पडली.

या पुजेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर,विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके, जिल्हा परिषदेच्या शैला गोडसे ,नितीन नकाते, प्रणव परिचारक,बापूराया चौगुले, अविनाश शिंदे, अनिल बिराजदार पुण्यनगरीचे उपसंपादक महेश खिस्ते साहेब देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भीमगोंडा पाटील, कल्लाप्पा  पाटील,मिस्टर सरपंच   संतोष सोनगे,किसन भजनावळे,नायब तहसिलदार सुधाकर मागाडे,पोलिस निरीक्षक अनिल गाडे,आदीसह सिध्दापूर ग्रामस्थ व ट्रस्ट चे पदाधिकारी उपस्थीत होते. सिध्दापुर पासुन तिन किलोमीटर अंतरावर भिमा तिरावर भरणार्या यात्रेस कर्नाटक महाराष्ट्रासह आंध्राचे लाखो भाविक येत असतात.परंन्तु निधी कमतरतेमुळे भाविकाना पुरेशा सुविधा देताना मंदीरसमितीवर तान पडत आहे.वर्षाला भाविकाच्या वाढत्या संख्यामुळे यात्रा कालावधी मध्ये भाविकाना,व्यापार्याना चांगल्या सुविधा देणे व यापरीसराचा चांगल्या प्रकारे कुंडल संगमच्या धरतीवर विकास होणे आवश्यक आहे. या पालकमंत्रीच्या अश्वसनाने भाविकाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

या वर्षी पुर्णपणे दुष्काळ पडले असताना सुध्दा भाविकाच्या ताटातली भाकरी महगली अस्ताना सुध्दा यात्राकाळातील भाविकाचा भक्तीचा झरा काही अटला नाही तो उत्साहने भक्तीने चिंब होऊन भक्तीमध्ये तल्लीन होता. भक्त आपले नवस फेङण्यासाठी सोन्याचादीचे कडदोरे,जानवे , पाळने पैजन,पादुका वस्तु दान देत होते.रक्कम स्वरूपात देणगी देत होते.दीवसभर ट्रस्टकडुन भक्ताना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. सकाळी महापुजेला आलेल्या अतिथी,मान्यवर गनाना मंदीर समितीचे अध्यक्ष भिमगोडा धुळगोडा पाटील याच्या वाड्यावर यथोच्छ मिष्ठअन्न व गावरान मेवा प्रेमाने जि.प मा. सदश्य बापुराया चोगुले सावकाराच्या मार्गदर्शनाखाली "अतिथी देवो भव" या उक्ती प्रमाने पाहुणचार करण्यात आला. सिध्दापुर मधील तरूणानी भाविकाना सेवा देण्यासाठी स्वंयस्फुरतीने स्वंयसेवक बनुन भाविकाना भक्ती--भावे सेवा दीली.संध्याकाळी गावात "श्री" च्या पालखीचे सवाध्य मिरवणुक काडण्यात आली.पालखीसमोर आतिषबाजीने भक्तगणाचे डोळ्याचे पारणे फीटले.रात्री 10.वाजता भक्तगणाना मनोरजंनासाठी मंदीरसमितीट्रस्ट कडुन कन्नड सामाजिक नाटक"चिनद्द गोंबे" चे सादरीकरण करण्यात आले.

Pages