वाणीचिंचाळे ग्रामस्थ व युवकांच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा, सत्कार.. - Pantnagari Times

Breaking News

Sunday, January 13, 2019

वाणीचिंचाळे ग्रामस्थ व युवकांच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा, सत्कार.. सांगोला / प्रतिनिधी

   वाणीचिंचाळे तालुका सांगोला येथे वाणीचिंचाळे युथ फाऊंडेशन व ग्रामस्थ वाणीचिंचाळे यांच्यावतीने  गावात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच पाणी. फाऊंडेशनमध्ये तालुक्यातील नंबर आलेल्या गावाच्या तसेच सर्व अधिकारी वर्गाचा व पत्रकार मित्रांचा सन्मान करण्यात आला.प्रथम कार्यक्रमात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतीमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये सभापती डॉ श्रुतिका लवटे, श्रीकांत देशमुख तालुका अध्यक्ष भाजप, पांडुरंग पांढरे माजी उपसभापती,प्रफुल्ल भैय्या कदम वाँटर आर्मी संस्थापक,नारायण जगताप पंचायत समिती सदस्य ,युवक नेते गणेश कांबळे, वनाअधिकारी जोशी साहेब, वनरक्षक बादने साहेब, कोरे साहेब, गायकवाड साहेब,साळुंखे ग्रामसेवक ,पत्रकार  चांद शेख यांचा सत्कार करण्यात आला.   तसेच सत्कारमुर्ती चिदानंद स्वामी सर, नागेश जाधव सर,बिभीषण सावंत ,अशोक गंगाधरे गुरुजी,शिवाजी जुजारे, आनिता शिंदे,रतनबाई पाटील सरपंच, ललिता खरात, मोनिका गडहिरे, सरस्वती गडहिरे उपसरपंच,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हा विजेते संघ,तसेच तालुका विजेता संघ व प्रगती विदयालयाचे तालुक्यात आलेले विद्यार्थी तसेच पाणी फाऊंडेशनमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल ,वाणीचिंचाळे यांचा दुसरा क्रमांक व बलवडी गावाचा तिसरा क्रमांक आल्याबद्दल सन्मानपत्र, शाल ,फेटा बांधून सन्मान करण्यात आला. 

     यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रफुल्ल भैय्या कदम यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन काम करावे असे सांगितले, तसेच वाणीचिंचाळे गावाच्या युवकांनी अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच माजी उपसभापती पांडुरंग भाऊ पांढरे यांनी गावाच्या विविध कार्यक्रमाबद्दल कौतुक केले तसेच जी मदत लागेल ती करण्याचे जाहीर केले.

      तसेच सभापती डॉ श्रुतिका लवटेताई यांनी अतिशय कमी व सुंदर शब्दात कार्यक्रमाचे कौतुक केले तसेच युवक कशाप्रकारे काम करु शकतो हे येथे आल्यावर दिसून येते असे सांगितले, तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून जी मदत लागेल ते करण्याचे जाहीर केले.

    तसेच सत्कारमुर्ती अशोक गंगाधरे ,चिदानंद स्वामी सर, व डिसकळ गावाच्या सरपंच शशीकला बाबर यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक स्वामी, सुत्रसंचालन सचिन गायकवाड,  विकास गडहिरे, विनोद गडहिरे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन दिपक स्वामी यांनी केले.सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी अनिल खरात, हणमंत जुजारे, सदाशिव जुजारे, संतोष पवार, रोहित पवार, सोमनाथ पवार, अनिरुद्ध पाटील, गणपत पाटील, सिकंदर पाटील, सागर जाधव, नितीन सोपे, सचिन सोपे, यशवंत लकडे,दादा काशीद, समाधान गायकवाड, अनसर घुणे,विजय घुणे,संदेश जगधने,अभिषेक गडहिरे, शशिकांत जावीर, सुकदेव जावीर, कैलास गडहिरे, महेश गडहिरे आकिप शेख,मुबारक शेख,रफिक शेख,पारेलाल शेख,सुनील पाटील, विनोद निळे यांच्या सह युवक फाऊंडेशनच्या सर्व सभासदांनी योगदान दिले. यावेळी गावातील ग्रामस्थ, महिला ,पदाधिकारी व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pages