मंगळवेढा / प्रतिनिधी
------------------------------
नंदेश्वर ता मंगळवेढा येथील सौ.कांचन बिरा करे यांना प्रतिष्ठा फाउंडेशनचा राज्यस्तरीय प्रतिष्ठा समाजरत्न पुरस्कार साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय काका पाटील कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत,मधुकर कांबळे,कवटेमहांकाळच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे प्रसिद्ध कवियञी उर्मिला चाकूरकर,प्रसिद्ध कथाकथनकार विश्वनाथ गायकवाड आणि प्रतिष्ठा फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजी जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या पुरस्कारामध्ये त्यांना 51000 रू चा चेक,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कांचन करे यांना याअगोदरही विविध सामाजिक संस्था व संघटनेचे अनेक सामाजिक कार्याबद्दल विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्या भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा
गटप्रवर्तक म्हणुन काम करत असुन या पुरस्काराबद्दल त्यांचे मंगळवेढा शहरासह तालुक्यामधुन मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत आहे.