मंगळवेढा/ प्रतिनिधी
------------------------------
पाटखळ ता. मंगळवेढा ग्रामपं चायत सदस्य परमेश्वर वाघमोडे यांनी खडकी येथील सतीमाता मंदिरामध्ये उपोषण सुरू केले आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील 24 गावांना पाणी मिळेपर्यंत ही गावे कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त घोषित करावी व या गावामध्ये दुष्काळी उपाययोजना लागू करण्यासाठी पाटखळ येथील हनुमान मंदिरामध्ये सलग चार दिवस उपोषण केले होते. या उपोषणाला विठ्ठल सहकारी कारखान्याचे संचालक भगीरथ भालके शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैलाताई गोडसे, तहसिलदार आप्पासाहेब समिंदर, तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी भेट देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली होती, तशिलदार आप्पासाहेब समिंदर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन या मागण्या शासन दरबारी पाठवणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र काहीही पूर्तता केली नसल्यामुळे मात्र काहीही पूर्तता न केल्याने परमेश्वर वाघमोडे यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या उपोषणाला या उपोषणाला तब्बल 19 ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतीने ठरावासह वाघमोडे यांना समर्थन दिले आहे. आज वाघमोडे यांच्या आंदोलनाला दामू कसबे ,सुखदेव बेलदार ,बापू मेटकरी, तानाजी चौगुले, संभाजी मस्के ,अशोक कसबे, दादा भाई शेख, बाळू शिंदे, नानासो कटारे, बंडू मेटकरी, नारायण मस्के, अप्पा वाघमोडे, यांच्यासह तब्बल 35 ते 40 जणांनी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे.