सोलापूर / प्रतिनिधी
75 वर्षे वयोवृद्ध आजीला प्रहार संघटनेने मिळवून दिला न्याय
सोलापूर (प्रतिनिधी ):-दिनांक 10. 12 .2018 रोजी बार्शी इथून माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक गाव इकडे निघाले असता भरधाव जाणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने मुलगी, जावई गंभीर जखमी झाल्या प्रकरणी माढा पोलिस स्टेशन येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी असलेल्या सुभद्राबाई घंटे हे घडलेल्या अपघाताबाबत तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी यांनी त्यांची कोणतीही दखल घेतली नाही तसेच त्यांना पोलीस स्टेशनच्या बाहेर हाकलून लावण्यात आल्या, गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस स्टेशनचे तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अपघातासंदर्भात फिर्याद घेण्यासाठी विनवणी करीत होत्या परंतु कोणतेही विनंतीला पोलिसांमार्फत न्याय दिला जात नसल्याने दिनांक 26 जानेवारी 2019 राेजी 75 वर्षांच्या वयोवृद्ध आजीने आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते दिवसभर जिल्हा परिषदेतील आंदोलन बसले असता उपाशीपोटी राहून आपले आंदोलन सुरूच ठेवले होते कोणतेही अधिकारी व कर्मचारी या आंदोलनाकडे फिरकले सुध्दा नाही. सायंकाळी 5 च्या सुमारास प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेचे सोलापूर शहर संपर्क प्रमुख जमीर शेख हे तिथून जातांना त्यांची नजर त्या उपोषणास बसलेल्या आजीबाई कडे गेली. त्याठिकाणी उपोषणासाठी बसल्या असल्याचे त्यांनी पाहिले ,पाहता क्षणी आज्जींकडे जाऊन विचारपूस केली असता सदरच्या माढा पोलीस स्टेशनच्या कामकाजाच्या सर्व व्यथा आजींने त्यांच्यासमोर बोलून दाखवल्या त्यानंतर त्यांनी लगेच पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच माढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लुकडे यांच्याशी संपर्क साधून तात्काळ गुन्हा दाखल करून घ्या अन्यथा कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनच्या समोर येऊन आंदोलन करण्यात येईल असे सांगताच त्यांची फिर्याद घेतो तात्काळ पाठवून द्या असे सांगितले.
त्यानंतर त्या आजींना नारळाचे पाणी देऊन प्रहार च्या वतीने त्यांचे उपोषण संपवण्यात आले न्याय मिळवून दिल्याबद्दल 75 वर्षे सुभद्राबाई घंटे स्वतंत्र सैनिक यांची पत्नी यांनी प्रहार संघटनेचे आभार मानून न्याय मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद दिले