मंगळवेढा येथील बसवेश्वर स्मारकासाठी 100 कोटी निधीची तरतूद करावी - शैलाताई गोडसे यांची अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी - Pantnagari Times

Breaking News

Sunday, January 27, 2019

मंगळवेढा येथील बसवेश्वर स्मारकासाठी 100 कोटी निधीची तरतूद करावी - शैलाताई गोडसे यांची अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी


 मंगळवेढा / प्रतिनिधी


मंगळवेढा येते जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभा राहणार आहे. या स्मारकासाठी कृषी विभागाची एकूण 65 एकर जमीन निश्चित केलेली आहे. या स्मारकाचे भूमिपूजन फेब्रुवारी महिन्यामध्ये केली जाण्याची शक्यता आहे. परंतु उद्घाटन होऊन स्मारकाची वाट बघत बसण्यापेक्षा या स्मारकासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून येणाऱ्या दोन वर्षांमध्ये हे स्मारक पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वर्षी 50 कोटी रुपये अशा पद्धतीने एकूण 100 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाच्या आगामी बजेटमध्ये करण्यात यावी व मंगळवेढ्याच्या वैभवा मध्ये या स्मारकाच्या निमित्ताने भर घालावी. अशी मागणी शिवसेना  महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी मंगळवेढा तालुका शिवसेना च्या वतीने  अर्थमंत्री ना. सुधिर मुनगुंटीवार यांचेकडे निवेदन देवुन केली आहे.

या स्मारकाचा प्रस्ताव तातडीने मंत्रालय स्तरावर राज्य शासनास सादर करण्यासाठी 14 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या बैठकीमध्ये शासनाच्या ग्रामविकास विभाग आणि सामान्य प्रशासकीय विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी सोलापूर यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या भव्य स्मारकासाठी शंभर कोटी रुपयांचा आराखडा तयार करून राज्य शासनाकडे सादर केला व या आराखड्यास 1 नोव्हेंबर 2018 रोजी अर्थमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली.

यावेळी अर्थमंत्री म्हणून ना. मुनगंटीवार यांनी या भव्य स्मारकासाठी निधीची कमतरता पडणार नाही असे सांगितले होते. महात्मा बसवेश्वर यांच्या भव्य स्मारका बरोबरच या ठिकाणी कृषी पर्यटन केंद्राची पण उभारणी केली जाणार आहे.  मंगळवेढा मध्ये महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात पहिली सभा आयोजित केली होती. त्यामुळे मंगळवेढा या संतांच्या भूमीचे पावित्र्य लक्षात घेता या ठिकाणी अति महत्त्वकांक्षी असे भव्य स्मारक उभा राहणे आवश्यक असल्याचे सर्व स्तरातून बोलले जात आहे. सुमारे पंधरा वर्षापासून महात्मा बसवेश्वर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक होणार आहे म्हणून वारंवार सामाजिक आणि राजकीय नेतृत्वाकडून चर्चा होत असते आता ही चर्चा चर्चा न राहता त्याचं रूपांतर प्रत्यक्ष अंमलबजावणी मध्ये झालं पाहिजे आणि त्यासाठी या आंतरराष्ट्रीय अशा भव्य स्मारकासाठी भरीव निधीची तरतूद महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक बजेट मध्ये करायला पाहिजे. जर या आंतरराष्ट्रीय भव्य स्मारकाचा आराखडा 100 कोटी असेल तर प्रत्येक वर्षी 50 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाच्या बजेटमध्ये करून या स्मारकाचे काम येणाऱ्या दोन वर्षांमध्ये पूर्ण करून मंगळवेढ्याच्या सौंदर्यामध्ये आणि वैभवा मध्ये भर घालावीअशी मागणी शिवसेना  महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी व शिवसेना  तालुका प्रमुख तुकाराम कुदळे, विधानसभा संघटक विजयराजे कुलबर्मे, शहर सन्मवयक नारायण गोवे, रमेश जाधव, रमेश ढगे, बाळू सरवळे, आनंद माने, संजय साळुंखे हे उपस्थित होते.

Pages